Faculty

About Us

प्रा. चंद्रकांत खेत्री सर

संस्थापक, CMD व CEO

प्रिय विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,

यशस्वी अकॅडमीच्या वतीने तुमचे मनःपूर्वक स्वागत!

स्पर्धा परीक्षा ही केवळ नोकरी मिळवण्याचा मार्ग नसून, समाजासाठी जबाबदार आणि सक्षम व्यक्तिमत्त्व घडवण्याची एक संधी आहे. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि स्वतःवर असलेला विश्वास यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, यावर आमचा ठाम विश्वास आहे.

यशस्वी अकॅडमीची स्थापना प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार, प्रामाणिक आणि परीक्षाभिमुख मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने करण्यात आली. अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, अद्ययावत अभ्यास साहित्य, नियमित टेस्ट सिरीज, PYQ विश्लेषण आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण उपलब्ध करून आम्ही विद्यार्थ्यांच्या यशासाठी सातत्याने कार्यरत आहोत.

आमचे स्वप्न केवळ परीक्षा शिकवण्यापुरते मर्यादित नाही. आम्हाला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त पाच एकर परिसरात अत्याधुनिक निवासी स्पर्धा परीक्षा अकॅडमी उभारायची आहे, जिथे शिक्षण, शिस्त, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचा संगम असेल. ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला समान संधी मिळावी, हेच आमचे ध्येय आहे.

प्रिय विद्यार्थ्यांनो, मोठी स्वप्ने पाहा, त्यासाठी मनापासून मेहनत करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या यशाच्या प्रत्येक प्रवासात यशस्वी अकॅडमी तुमची विश्वासू साथीदार म्हणून कायम उभी राहील.

तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

प्रा. चंद्रकांत खेत्री सर

संचालक, यशस्वी अकॅडमी, पुणे